१८९५ मध्ये काँग्रेसचे पुण्यातील अधिवेशन मुंबईत हलवण्यात आले होते. त्यानंतर एवढी मोठी साथ पहिल्यांदाच आली आहे. या आजाराची झळ जगाला बसली आहे. आता देशातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र, नागरिकांनी बेफिकिर राहू नये, प्रत्येकाने काळजी घ्यावी. कारण इतर देशात दुसरी लाट सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वानी काळजी घ्यावी. या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने जे जे करायचं ते ते केलं आहे.












