मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात राज्याच्या सचिवांसोबत आज पुण्यात सविस्तर चर्चा झाली. यामध्ये पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निर्णय घेणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, तरी देखील आमचं म्हणणं सचिवांची ऐकून घेतलं आहे. आता ते आमच्या मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत घेऊन जाणार आहेत तसेच सोमवारी याबाबत कळवतील. त्यानंतर आम्ही पुढील दिशा ठरविणार आहोत. आता मुंबईच्या दिशेने जाणार नाही, पण आमची लढाई अजूनही संपलेली नाही, असं मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी सांगितलं.





















