गेल्या साधारण दीड वर्षांपासून देश करोना विषाणूच्या प्रादुर्भावाखाली आहे. करोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचे संकेतही देण्यात आलेत. तिसऱ्या लाटेला वेळीच थोपवण्यासाठी देशभरात तयारीही सुरू आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल अंदाज वर्तवण्यात येत असतानाच तिसरी लाट कधी येणार याबद्दल बनारस हिंदू विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी खुलासा केला आहे.