राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृह मोठ्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली आहेत. राज्य सरकारने जारी केलेल्या जीआरनुसार 22 ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृहे खुली झाली खरी मात्र, पहिल्याच दिवशी मुंबईतील सिनेमागृहांना थंड प्रतिसाद मिळाला. राज्यसरकारने लावलेल्या कडक निर्बंधांमुळे सिनेमाप्रेमींनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
















