Amol Kolhe Interview: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडतील असं विधान राष्ट्रवादीचेचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलं होतं. त्यानंतर या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. त्यावर आता अमोल कोल्हेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.
पिंपरी- चिंचवडमधील दिशा सोशल फाउंडेशनने अमोल कोल्हे यांची मुलाखत आयोजित केली होती. या मुलाखतीत अमोल कोल्हेंनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.

















