स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धरणात उडी मारत ५ मुलींना वाचवलं; खडकवासला दुर्घटनेतील देवदूताला सलाम
पुण्यातील खडकवासला धरण परिसरात ९ मुली पोहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी ७ मुली पाण्यात बुडाल्याची घटना घडली होती. त्यापैकी पाच मुलींना वाचविण्यात यश आले. तर दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर या घटनेच्यावेळी गोऱ्हे खुर्द येथील ५३ वर्षीय संजय सीताराम माताळे यांनी पाच मुलींचा जीव वाचवण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे