The Kerala Story: पुण्यात FTII मध्ये ‘द केरला स्टोरी’ दाखवण्यावरुन वाद!; विद्यार्थ्यांची निदर्शने
सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटावर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. काहींनी हा चित्रपट प्रपोगांडा असल्याचं म्हटलं आहे. तर काही ठिकाणी या चित्रपटावर बंदीही घालण्यात आली होती. त्याच दरम्यान पुण्यातील एफटीआयआय (FTII)मध्ये ‘मिती’या संस्थेकडून ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा विशेष निमंत्रित व्यक्तीसाठी शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एफटीआयआयमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थिनी द केरला स्टोरी दाखवू नये असा आक्षेप घेतला. त्यानंतर विद्यार्थी आणि आयोजकांमध्ये वादा झाल्याची घटना घडली. त्यामुळे काही काळ तणावाचे निर्माण झाले होते.