२००० रुपयांची नोट वितरणातून बंद केल्यानंतर आता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरबीआयचा २००० रुपयांची नोट आणण्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. २००० रुपयांच्या नोटा बदलून त्या जमा केल्या जातील, यासाठी चांगली प्रणाली कार्यरत आहे. जेणेकरून सामान्य लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. यासाठी बँकांना पूर्णपणे तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं