Supriya Sule: बस बिघडल्याने प्रवाशांची गैरसोय; सुप्रिया सुळेंनी गाडी थांबवून काय केलं पाहा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघातील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी वाटेत त्यांनी शिवशाही बस बिघडल्याने प्रवाशांची गैरसोय झाल्याचं पाहिलं. तेव्हा स्वतःच्या ताफ्यातील एका गाडीतून त्यांनी काही प्रवाशांना शिवापूर टोलनाक्यापर्यंत पोहोचवलं. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे