मुंबई-पुणे डेक्कन क्विन ट्रेनला आज १ जून रोजी ९३ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने पुणे रेल्वे स्थानकात डेक्कन क्विनचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील यावेळी उपस्थित होते. यानिमित्ताने प्रवाशांच्या लाडक्या डेक्कन क्विनला हार फुलांनी सजवण्यात आलं आहे.