मावळ लोकसभा मतदार संघात युती आणि महाविकासआघाडीत रस्सीखेच सुरु आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांचा उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंसाठी शक्तिप्रदर्शन करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्या (१६ जून) मावळ लोकसभेच्या दौऱ्यावर असणार आहेत. अशातच युतीचे मावळ लोकसभेचे उमेदवार आपणच असू असा ठाम दावा बारणे यांनी केला आहे.