वर्धापन दिनाच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना एक नोटीस येताच त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती, असं विधान केलं. त्यावर आता खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ईडीने नुसते डोळे वटारले तर एकनाथ शिंदे पळून गेले आणि पक्षांतर केलं. ते कुठल्या नोटीसची गोष्ट करताहेत, असा टोला संजय राऊतांनी लगावला.














