West Bengal Train Accident: एका मालगाडीची दुसऱ्या मालगाडीला धडक; १२ डब्बे रुळावरून खाली घसरले
ओडिशातील बालासोर येथे तीन रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. या घटनेनंतर आता पश्चिम बंगालमध्ये आणखी एक रेल्वे अपघात घडला आहे. रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीला दुसऱ्या मालगाडीने धडक दिली आहे. या धडकेत मालगाडीचे १२ डब्बे रुळावरून खाली घसरले आहेत. दरम्यान, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही