ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना थेट ठाकरे गट-मनसे युतीबद्दल प्रश्न विचारला असता त्यावर संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंशी बोलण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. ना उद्धव ठाकरेंना, ना राज ठाकरे यांना, दोघांनाही अशा कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही. दोन भाऊ कधीही एकेमेकांशी बोलू शकतात. त्यासाठी कोणी आमच्याकडे येऊन बोलण्याची गरज नाही. फक्त एक फोन उचलायचा आहे आणि बोलायचं आहे, इतकंच अंतर आहे”



















