Kolhapur: हसन मुश्रीफांना शुभेच्छा देण्यावरून ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाची सतेज पाटलांवर नाराजी
नव्या मंत्रिमंडळात समावेश झालेल्या हसन मुश्रीफ त्यांना शुभेच्छा देण्यावरून कोल्हापुरात महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे गटाचे शहर प्रमुख रवीकरण इंगवले यांनी पत्रकारांशी बोलताना नाराजी उघड केली. महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते असताना सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना शुभेच्छा देत सोयीचं राजकारण केले आहे. याबाबत ठाकरे गटातील वरिष्ठांना कळवणार असल्याचे देखील इंगवले यांनी म्हटल आहे. एखाद्या सामान्य कार्यकर्त्याने असं कृत्य केलं असतं तर त्याच्यावर निलंबन किंवा कारणे दाखवा नोटीस ची कारवाई झाली असती. मात्र असं सोयीचे राजकारण करणाऱ्या नेत्यांचं काय असा प्रश्न देखील इंगवले यांनी उपस्थित केला आहे.