ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसरकारवर टीका करताना “महाराष्ट्राचे संपुर्ण सरकारच कलंकित आहे. PMLA कायद्यानुसार आरोपीकडील कलंकित धन दुसऱ्याच्या खात्यावर गेले की तोसुध्दा गुन्हेगार ठरतो. राष्ट्रवादी तसेच शिवसेनेकडील सर्व कलंकित खाती खातेदारांसह भाजपा सरकारमध्ये सामील झाली” असे वक्तव्य केले आहे. त्याचसोबत ‘या कलंकित सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस अंगाला काळी हळद लावून बसले आहेत’ असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला.












