स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दहाव्यांदा संबोधित केलं. लाल किल्ल्यावरून त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी मोदींनी मणिपूर हिंसाचाराचा देखील उल्लेख केला. शांततेतूनच मार्ग निघेल. देश मणिपूरमधील नागरिकांबरोबर आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.