महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्यावतीने आयोजित ६३वा द्राक्ष परिषदेचा समारोप कार्यक्रम सोमवारी (२८ ऑगस्ट) पिंपरी चिंचवडमध्ये पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा रंगली आहे. आपण अद्याप दारूला स्पर्श केलेला नाही, असं सांगताना अजित पवार यांनी केलेल्या विधानाने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.