मराठा आरक्षणावरून राजकीय नेत्यांना गावबंदी ही मोठ्या प्रमाणावर दिसून येतेय. याच संबंधी छगन भुजबळ यांना एक मेसेज आला होता, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कोणी मला गाव बंदी करू शकत नाही. गाव बंद केली तर एक महिन्याची सजा आहे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत लिहिली आहे. तसेच सोशल मीडियावर येणाऱ्या धमक्यांना छगन भुजबळ घाबरत नाही” अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी येवला दौऱ्यावर आले असताना पत्रकारांशी बोलताना दिली.
  
  
  
  







 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 










