मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता मनोज जरांगे पाटलांनी सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. ही तारीख जवळ आल्याने आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याकरता मनोज जरांगे यांनी आज (१७ डिसेंबर) मराठा समाजाची अंतरवली सराटी येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीवेळी जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला.