एकीकडे महाराष्ट्रासह देशात निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडत आहे. तर दुसरीकरडे पुढील टप्प्यातील मतदानासाठी प्रचारही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज (१३ मे) महाराष्ट्रात आहेत. महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ अमित शहा यांची जाहीर सभा धुळ्यात होत आहे.
 
   
   
   
  







 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 










 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  