भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळाल्यानंतर मुंडे समर्थकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. बीड जवळील नामलगाव गणपतीला मुंडे समर्थकाने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळावी. त्याबरोबरच मंत्रिपद मिळावं, असा नवस केला होता. हा नवस पूर्ण झाल्याने गणेश लांडे मंदिरात पाच हजार नारळ फोडणार आहेत.











