Big News By Modi Government For Onion Farmers: कांदा निर्यात मूल्य रद्द केल्याने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरला आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द केले असून कांद्यावरील निर्यात शुल्कात देखील 20% कपात केली आहे. येवल्यातील कांदा व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये नक्कीच या सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. शेतकऱ्यांमध्ये देखील या निर्णयामुळे आनंद दिसून येत आहे. तर आज कांद्याचा भाव देखील काही प्रमाणात वाढ झाल्याचे यावेळी दिसून आले. याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ तसेच शेतकरी व कांदा व्यापाऱ्यांनी काय म्हटलंय हे पाहूया.