आमदार आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहराचे ग्रामदैवत मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतले.त्यावेळी पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी मविआच्या जागावाटपाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. तसेच “24 तारखेला आमचा मुख्यमंत्री शपथ घेईल”, असंही ते यावेळी म्हणाले.





















