राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. ठिकठिकाणी राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा आयोजित केल्या जात आहेत. अशातच एका प्रचारसभेला जात असताना सलग दोन दिवस उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली आहे. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.
















