Parbhani Violence Effect In Mumbai: परभणीच्या घटनेवरून आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. परभणीतील दोषींवर कारवाई करावी आणि मृत झालेल्या कार्यकर्त्याला नुकसान भरपाई म्हणून एक कोटी देण्यात यावे अशी मागणी आंदोलकांकडून होत आहे. आंदोलकावरील झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी कार्यकर्त्यांनी हा रास्ता रोको केला आहे.