मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. गुंतवणुकीच्यादृष्टीने हा दौरा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. देवेंद्र फडणवीस यंदा जवळपास ७ लाख कोटी रुपयांचे विविध गुंतवणूक करार करतील, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. मात्र गुंतवणुकीच्याबाबतीत महाराष्ट्र मागे का पडतोय? त्याची कारणं नेमकी काय आहेत? याविषयी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे विश्लेषण..
 
   
   
   
  











 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 











 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  