Pune: सरकारने घरगुती वापरासाठीचा एलपीजी गॅस सिलिंडर ५० रुपये महाग केल्याचं जाहीर केलं आहे. उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत ५०३ रुपयांना मिळणारा सिलिंडर आता ५५३ रुपयांना मिळणार आहे तर ही योजना सोडून असलेला एक सिलिंडर ८०३ रुपयांवरुन ८५३ रुपये इतका झाला आहे. ८ एप्रिलपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.