शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कुटुंबासह परदेशात आहेत. तर आज उद्धव ठाकरेदेखील कुटुंबासह परदेशात जाणार आहेत. त्यामुळे युतीच्या चर्चेनं अधिक जोर धरला आहे. याबद्दल बोलताना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचं सूचक विधान केलं आहे.