India vs Pakistan War Prediction After Pahalgam Terrorist Attack: यावर्षी पावसाचे अंदाज काय राहतील..? याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकीय भाकीत, पृथ्वीतलावर येणारी संकटे, परकीय शत्रूपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज घेणाऱ्या भेंडवळ मांडणीच्या भाकिताकडे शेतकऱ्यांच, राजकीय नेत्यांच लक्ष लागलेल असतं. अशातच नुकताच झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत असताना कुठल्याही परिस्थिती मध्ये युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर भेंडवळच्या घट मांडणीच्या अंदाजाला ही मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. युद्ध होणार की नाही? हे ही या भेंडवळच्या घट मांडणीत अंदाज जाहीर करण्यात आले.