महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या सर्व विभागांसाठी एक १०० दिवसांचा धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला होता. या १०० दिवसांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक योजना, विकासाची कामे, अनेक प्रकल्प मार्गी लावण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने शंभर दिवसांच्या कृती आराखड्याची संकल्पना मांडली होती. आता या १०० दिवसांच्या कामांचा अहवाल राज्य सरकारने सादर केला आहे.