Mallikarjun Kharge on Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोठा दावा केला आहे. पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी जम्मू आणि काश्मीरमधील संभाव्य हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींना गुप्तचर अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी आपला दौरा रद्द केला, असा दावा मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.