Influencer Killed In Live Streaming: सोशल मीडियाला हादरवून टाकणारा एक भयंकर गुन्हा एका इन्फ्लुएन्सरच्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये घडल्याचं कळतंय. २३ वर्षीय ब्युटी इन्फ्लुएंसर व्हॅलेरिया म्र्क्वेझ हिची एका सॅलोनमध्ये टिकटॉकवर लाईव्ह स्ट्रीमिंग करताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ब्युटी आणि लाइफस्टाइल संबंधित व्हिडीओ बनवणारी व्हॅलेरिया ही मूळची मेक्सिको येथील इन्फ्लुएन्सर होती. तब्बल ३ लाखाहून अधिक फॉलोवर्स असलेल्या तिच्या अकाउंटवर ती मंगळवारी लाईव्ह गेलेली असतानाच एका इसमाने डिलिव्हरी बॉयच्या वेशात येऊन व्हॅलेरियावर हल्ला केला आणि तिची गोळ्या घालून हत्या केली आहे.