Ashish Shelar: मुंबईसह राज्यभरात पावसानं हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील रस्ते जलमय झाले. अशातच मुंबईतील ज्या ज्या ठिकाणी पाणी तुंबले आहेत, त्या ठिकाणांची पाहणी आदित्य ठाकरे यांनी केली. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली आहे. अशातच आता आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.