भाजपाचे आमदार परिणय फुके यांच्या भावजय प्रिया फुके यांनी केलेल्या आरोपांनंतर एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे, प्रिया फुके यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.























