पहगलाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. या घटनेनंतर एकीकडे देशभरातून भारतीय सैन्य दलाच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे. तर दुसरीकडे हेरगिरी प्रकरणात हरयाणातील ज्योती मल्होत्रा या यूट्युबरला अटक करण्यात आली आहे. त्यातच आता अशाच एका प्रकरणात कळव्यातील एका २७ वर्षीय अभियंत्याला दहशतवादविरोधी पथकानं ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. याविषयी सविस्तर माहिती पाहू या.