मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी युती संदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता आपल्याला याबद्दल माहिती नाही, असं ते म्हणाले. तसंच याबद्दल संजय राऊतांशी चर्चा करणार का? या प्रश्नाचंही त्यांनी उत्तर दिलं आहे.