कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. मात्र या दुर्घटनेनंतर त्यांनी घटनास्थळी भेट न दिल्याने विरोधकांकडून टीका केली जात होती. मात्र मंगळवारी अजित पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली.