शाळांमध्ये पहिलीपासून त्रिभाषा सूत्र अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर हिंदी सक्ती केली जात असल्याची टीका आता सर्वच स्तरातून होत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधतानात तिसऱ्या भाषेच्या संदर्भातील शासन निर्णयात कुठेही अनिवार्य असा शब्द वापरलेला नाही. तिसरी भाषा शिकण्यासंदर्भात विद्यार्थी व पालकांवर सोपवलेलं आहे, असं दादा भुसे म्हणाले.