त्रिभाषा सुत्राचा जीआर मविआ सरकारमध्ये काढण्यात आला. मात्र सत्तेत असलं की वेगळं बोलयचा सत्तेतून बाहेर आलं की वेगळं बोलयाचं. ही जी पद्धत आहे यामध्ये केवळ विरोधाला विरोध दिसत आहे. त्यामुळे खरंतर या सगळ्यात राज ठाकरेंनी पहिला प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे. तुम्हीच मान्यता दिली तर आता कुठल्या तोंडाने आंदोलय? हा प्रश्न विचारला पाहिजे, असा टोला मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.