दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठाबाहेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गुरुवारी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. दरम्यान, बाहेर ही निर्दशनं सुरू असताना देवेंद्र फडणवीसांनी कार्यक्रमात मराठ-हिंदी वादावर पुन्हा एकदा भूमिका मांडली.