Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्ध्यात विदर्भ भाजपाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ भाजपाच्या कार्यकर्त्यांचे विधानसभा निवडणुकीतील कामगिरीबाबत कौतुक केले. याचबरोबर त्यांनी येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करण्याचा आणि निवडणूक काळात पक्षांतर्गत वाद व गटबाजी टाळण्याचा इशारा दिला आहे.