गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष तयारी सुरू केली आहे. यामध्ये लातूर विभागातील २०० हून अधिक बसगाड्या पनवेलमध्ये दाखल झाल्या आहेत. या गाड्यांमुळे मुंबई आणि उपनगरमधील कोकणवासीयांना कोकणात घेऊन जाण्यास मदत होणार आहे. दरम्यान संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पा शेजारी उलवे -करंजाडे रस्त्यावर या बसगाड्या थांबवण्याची व्यवस्था केली आहे.