पुण्यातील एका सुशिक्षित दांपत्याला मुलींच्या आजारपणाचा फायदा घेऊन कोट्यवधी रुपयांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘शंकर बाबा’ अंगात येत असल्याचे भासवून महिलेने त्यांचे परदेशातील घर विकण्यास भाग पाडले, कर्ज काढायला लावले. मुली बऱ्या होतील या आशेने त्यांनी पैसे दिले, पण फसवणूक लक्षात येताच पोलिसांत धाव घेतली.
















