उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून कोरेगाव पार्क येथील महार वतनाची १८०० कोटींची जमीन केवळ ३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली. शिवाय या व्यवहाराची नोंदणी करताना फक्त ५०० रुपये मुद्रांक वसूल करण्यात आला. प्रत्यक्षात या व्यवहारात ६ कोटी रुपयांचा मुद्रांक भरणं आवश्यक होतं. मात्र अजित पवारांच्या मुलाच्या कंपनीसाठी साऱ्या सवलती देण्यात आल्याचा आरोप होत आहे. यावरून आता विरोधकांनी अजित पवारांसह महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. दरम्यान या प्रकरणी मुद्रांक शुल्क बुडवून राज्य शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय राज्याच्या मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागाने घेतला आहे. मात्र यामध्ये पार्थ पवारांचं नाव नाही. त्यावरून आता ठाकरे गटाच्या खासदार सुषमा अंधारे यांनी पोस्ट लिहून काही सवाल उपस्थित केले आहेत.
















