ऐतिहासिक लाल किल्ल्याचा सदैव गजबजलेला परिसर सोमवारी सायंकाळी एका कारमध्ये झालेल्या स्फोटाने हादरून गेला. लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या सिग्नलजवळ झालेल्या घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी आहेत. जम्मू-काश्मीरमधील मोहिमेतून घातपाताचा मोठा कट उधळून लावल्याचा दावा तीन राज्यांचे पोलीस करत असताना झालेला हा स्फोट दहशतवादी कृत्य आहे की नाही, याबाबत केंद्र सरकार किंवा तपास यंत्रणांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, १४ वर्षांनंतर दिल्लीत घडलेल्या स्फोटाच्या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे. मात्र हा स्फोट नेमका झाला कसा? दिल्लीसह देशभरातील कोणत्या प्रमुख शहरांत अलर्ट जारी करण्यात आला आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ





















