‘सुंदर मुंबई, स्वच्छ मुंबई’चे स्वप्न वास्तवात साकारण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रख्यात बोधचित्रकाराकडून ‘माझी मुंबई’ हे बोधचित्र बनवून घेतले आणि त्याचा तात्काळ वापरही सुरू केला. मात्र बोधचित्रकाराने ५५ लाख रुपयांचे बिल सादर केल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या योजनेतून हे बोधचिन्ह गायब झाले. बोधचित्रकाराची अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना कठोर शासन करावे, अशी मागणी नगरसेवकांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत केली.
घनकचरा व्यवस्थापनाने मुंबईत स्वच्छता राखण्यासाठी ‘माझी मुंबई’ हे बोधचिन्ह प्रख्यात बोधचित्रकारांकडून तयार करून घेतले होते. मोठा गाजावाजा करीत पालिकेने बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते या बोधचिन्हाचे प्रकाशनही केले होते. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनाने हे बोधचिन्ह वापरण्यास सुरुवात केली. कालांतराने बोधचिन्हकाराने बनवून दिलेल्या बोधचिन्हाचा खर्च म्हणून ५५ लाख रुपयांचे बिल पालिकेला पाठविले होते. बिल हाती पडताच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांचे धाबेच दणाणले. त्यांनी तात्काळ बोधचिन्हाचा वापर बंद केला. मात्र आजतागायत हा प्रश्न रेंगाळला आहे. या प्रश्नाला मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी वाचा फोडली.
बोधचित्रकाराकडून बोधचिन्ह बनवून घ्यायचे आणि काही दिवस ते वापरायचे. त्यानंतर बिल हाती पडल्यानंतर त्याचा वापर थांबवायचा. अशा पद्धतीने बोधचित्रकाराचा अपमान पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. बोधचिन्ह बनवून घेण्यासाठी पुढाकार घेणारे पालिकेचे जनसंपर्क अधिकारी आणि घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी देशपांडे आणि अन्य नगरसेवकांनी या वेळी केली.
संग्रहित लेख, दिनांक 1st May 2015 रोजी प्रकाशित
बोधचिन्हकाराचे ५५ लाखांचे बिल पालिकेने थकविले
‘सुंदर मुंबई, स्वच्छ मुंबई’चे स्वप्न वास्तवात साकारण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रख्यात बोधचित्रकाराकडून ‘माझी मुंबई’ हे बोधचित्र बनवून घेतले आणि त्याचा तात्काळ वापरही सुरू केला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 01-05-2015 at 12:08 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc not paid 55 lakh to logo designers