बॉम्बे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. दुर्गाप्रसाद व्यास यांचे नुकतेच आजाराने निधन झाले.
डॉ. व्यास यांचा जन्म राजस्थानमधील जोधपूर येथे झाला होता. तेथेच वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर डॉ. व्यास यांनी बिट्स पिलानी येथून वैद्यकीय व्यवस्थापनात एम.फिल.ची पदवी घेतली. निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली आणि बॉम्बे रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालकपदापर्यंत ते पोहोचले. गरजू तसेच दूरवरून उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी ते नेहमीच तत्पर असत. आपले सहकारी, कनिष्ठ कर्मचारी यांच्यात ते लोकप्रिय होते. रुग्णसेवेसाठी जोधपूरच्या महाराजांच्या हस्ते डॉ. व्यास यांचा सत्कार करण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr durgaprasad vyas passes away