Cancer Symptoms in Body: खराब आहार आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे सध्या अनेक गंभीर आजारांची शक्यता झपाट्याने वाढत आहे. यापैकी एक आहे कोलन कॅन्सर, म्हणजेच मोठ्या आतड्यांचा कॅन्सर. हा कॅन्सर मोठ्या आतड्यांच्या आतल्या भागातून सुरू होतो आणि सुरुवातीला छोट्या-छोट्या गाठी किंवा पॉलिप्सच्या रूपात दिसतो. जर वेळेवर उपचार केले गेले नाही, तर हे पुढे कॅन्सरमध्ये बदलू शकते.