बंगळुरु येथे मुलगी श्रीजा रेड्डीच्या आत्महत्येनंतर तिच्या आई रचिता रेड्डी यांनीही आत्महत्या केली. श्रीजाने आत्महत्या केल्याची माहिती रचिताने पतीला दिली आणि तिच्याशिवाय जगू शकत नसल्याचे सांगितले. पती घरी येईपर्यंत रचितानेही आयुष्य संपवले. श्रीजाची सुसाईड नोट सापडली असून, ती नैराश्यात असल्याचे पोलिसांचा अंदाज आहे. या घटनेमुळे श्रीधर रेड्डींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.